पुर्णा: बंद पडलेल्या पिकप जवळ जेवण करणाऱ्या इसमाचा एसटीच्या धडकेत मृत्यू, भारती कॅम्प शिवारातील घटना
Purna, Parbhani | Oct 25, 2025 पिकप वाहन बंद पडल्याने वाहन रस्त्याच्या खाली उभे करून बाजूला झाडाखाली जेवण करीत बसलेल्या चालकाला समोरून आलेल्या अनियंत्रित एसटी बसची धडक बसून मृत्यू झाल्याची घटना परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गावरील पूर्णा तालुक्यातील भारती कॅम्प शिवारात घडली. या प्रकरणात 24 ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.