अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटील आणि तनपुरे ही दोन्ही घराणी पहिल्यापासूनच एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. त्यातच आता ऐन नगरपरिषद निवडणूकांच्या रणधूमाळीत सुजय विखेंनी संस्कार आणि आदर हा राजकारणापलीकडे आहे याचे एक उत्तम उदाहरणं दिले. एका कार्यक्रमात सुजय विखे डॉ. उषाताई तनपुरे यांच्या पाया पडताना दिसत आहे.यामुळे सर्वांच्या डोळ्याला एक सुखद दिलासा मिळाला.