महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2025 चे आयोजन रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत उपलब्ध राहणार असल्याची माहिती दि. 08 नोव्हेंबर रोजी जिमाकाच्यावतीने देण्यात आली आहे.