उत्तर सोलापूर: उसाची एफआरपी द्या म्हणून शेतकऱ्यांचे रंगभवन येथील काँग्रेस भवन समोर उपोषण
मातोश्री कारखान्यात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी टनाला 2700 भाव जाहीर केला आहे. काही ठराविक शेतकऱ्यांना पाचशे आणि काहीना सातशे प्रमाणे बँकेच्या खात्यात जमा केले आहेत. मागील आठ महिन्यांपासून एक रुपयाही खात्यामध्ये जमा केलेला नाही, थकीत बिल मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आज बुधवारी काँग्रेस भवन समोर हे उपोषण सुरू केले आहे.