शहरातील प्रशासकीय निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिपळा रोडवरील जुन्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन जवळ असलेल्या एका उघड्या गटारामध्ये (गडर) एक सांड पडल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील गटारावर झाकण नसल्यामुळे हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.