हिंगणा: वानाडोंगरी नगरपरिषद : मतदानासाठी ५२ केंद्र सुसज्ज
Hingna, Nagpur | Nov 10, 2025 वानाडोंगरी नगरपरिषदेच्या २ डिसेंबरला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तब्बल ५२ मतदान केंद्रांवर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यावेळी मतदान केंद्रांची संख्या दीडपट झाली आहे. मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व प्रसारमाध्यमांना निवडणूक प्रक्रिया व आचारसंहितेबाबत माहिती दिली.सोमवार (१० नोव्हेंबर) पासून १७ तारखेपर्यंत ११ ते ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. १८ नोव्हेंबरला छाननी आणि २१ तारखेपर्यंतअर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे.