आर्णी: विश्राम गृह येथे
शेकडो महिला व पुरुषांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश
Arni, Yavatmal | Oct 11, 2025 शहरातील विश्रामगृहावर आज मोठ्या उत्साहात शिवसेना (शिंदे गट) प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी शेकडो महिला व पुरुषांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. या प्रवेश सोहळ्याला जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांना पक्षाचा भगवा ओढवण्यात आला. यावेळी बोलताना जाधव यांनी सांगितले की, "शिवसेना (शिंदे गट) ही जनतेच्या समस्यांसाठी लढणारी खरी शिवसेना आहे. येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुक