ठाणे: मी तमिळ असलो तरी मला मराठीचा अभिमान, ज्यांना मराठी नको त्यांनी इथून जावे, समाजसेवक अजय जयांचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रात सध्या हिंदी आणि मराठी भाषा बोलण्यावरून वाद होत आहेत काही परप्रांतीय व्यावसायिक आम्ही मराठी बोलणारच नाही तसे वक्तव्य करत आहेत त्यामुळे त्या नावाचे वातावरण काही ठिकाणी निर्माण होत आहे मात्र दुसरीकडे काही परप्रांतीय मराठी भाषा आपुलकीने बोलत असून त्यांना अभिमान आहे. ठाण्यातील समाजसेवक यांचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी तामिळ असलो तरी मला मराठीचा अभिमान आहे.ज्यांना मराठी नको आहे त्यांनी इथून जावे असे वक्तव्य केले असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे