कारंजा: कन्नमवार ग्राम येथे दारू विक्री करताना पोलिसांनी एकावर केली कार्यवाही गावठी दारू केली जप्त
कन्नमवार ग्राम येथे दारू विक्री करताना पोलिसांनी दिनांक पाच तारखेला रात्री साडेसातच्या दरम्यान कार्यवाही करून गावठी मोहा दारू जप्त केली. दिलीप गोमाजी दूधकोहळे वय 52 वर्ष राहणार कन्नमवार ग्राम कारंजा याच्यावर कारंजा पोलिसांनी अपराध क्रमांक 737 ऑब्लिक 2025 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केले असल्याचे सांगितले