विक्रमगड: अनधिकृत फेरीवाल्यांवर आचोळे परिसरात महानगरपालिकेची तोडक कारवाई
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. नालासोपारा पूर्व, आचोळे परिसरात अनधिकृत फेरीवाल्यां मुळे व त्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी त्याचप्रमाणे नागरिकांना चालताना मोठा त्रास होत होता. परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत फेरीवाले व त्यांनी केलेले अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने तोडून निष्कासित करण्यात आले