जालना: आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय प्रभारी अधिकारी डॉ. संदीप राठोड यांचा परतूर दौरा
Jalna, Jalna | Dec 23, 2025 आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसह विविध विकासात्मक उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नीति आयोग, नवी दिल्ली मार्फत जालना जिल्ह्यातील परतूर तालुका व बदनापूरसाठी नियुक्त केंद्रीय प्रभारी अधिकारी डॉ. संदीप रेवाजी राठोड यांनी परतूर तालुक्याचा दौरा केला. मंगळवार दि. 23 डिसेंबर 2025 रोजी सांयकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी गावकर्यांसोबत संवाद साधून उपक्रमाचा आढावा देखील घेतला. या दौर्यादरम्यान त्यांनी लोणी खुर्द ग्रामपंचायतीची पाहणी केली.