पाचोरा: पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढी एकादशीनिमित्त पाचोरा चौफुलीवर भाविकांसाठी 10 क्विंटल साबुदाणा खिचडी व पेढे वाटप,
प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या समर्थ गोविंद महाराज यांच्या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. या भाविकांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यासाठी समाजसेवक आणि ग्रामस्थ पुढे सरसावले. या यात्रेनिमित्त परधाडे येथील प्रकाश भिला पाटील व पिंपळगाव येथील गोविंद रामदास पाटील यांनी मिळून गावातीलच पाचोरा चौफुलीवर आज दिनांक 6 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून वाटप केली,