नागपूर ग्रामीण: नागपूर भंडारा रोडवर पेट्रोल टँकरला ट्रकची मागून धडक ; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
नागपूर भंडारा रोडवर आज मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार या रोडने जाणाऱ्या पेट्रोल टॅंकरने अचानक ब्रेक दाबले आणि पेट्रोल टँकर जागेवरच थांबले दरम्यान एकामागून एक येणाऱ्या ट्रकची त्या टँकरला धडक बसली. अपघात इतका भीषण होता की या अपघातात ट्रकच्या समोरील भाग पूर्णपणे चकाना चूर झाला असून मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी मात्र झाली नाही.