आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 वार शनिवार रोजी रात्री 9 वाजता भोकरदन शहरातील काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयावर काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भोकरदन शहरातील शरद पवार राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते जाहीर कुरेशी यांनी व त्यांच्या शेकडो समर्थकांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी या सर्वांचे काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी स्वागत करत पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले आहे.