जालना शहरातील जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मंगळवार, दिनांक 23 डिसेंबर 2025 पासून नामनिर्देशन पत्रांची विक्री व स्वीकृती प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. मंगळवार दि. 23 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण 15 विभागांसाठी नोडल अधिकार्यांची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 804 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली.