राहुरी: आ.शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनाने राजकीय अस्थिरता निर्माण झाली;माजी खासदार सुजय विखें पा.
विखे परिवार अन् कर्डिले परिवार हा गेल्या कित्येक वर्षापासून एकत्र राहिलेला आहे. शिवाजीराव कर्डिले हे माझे राजकीय गुरु होते. प्रत्येक चढ-उतारात आम्ही बरोबर होतो. आता शिवाजीराव कर्डिले यांचे निधनाने राजकीय अस्थिरता निर्माण झाली असल्याची प्रक्रिया माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. आज शुक्रवारी सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.