यवतमाळ: अतिवृष्टी नुकसान मदत वितरणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करावी ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अतिवृष्टी व पुरामुळे जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत ६ लक्ष ५५ हजार ४२.८६ हे. आर शेती पिकाचे नुकसान झाले असून ५लक्ष ३० हजार ७३६ शेतकरी बाधित झाले आहे. या करिता शासन स्तरावरून विविध शासन निर्णया नुसार ५५८ कोटी ८२.०९ लक्ष इतका निधी मंजूर झाला आहे. ई - पंचनामा पोर्टलवर आतापर्यंत ४ लक्ष ५१ हजार ५९५ बाधित शेतकरी यांचे याद्या अपलोड झाले असून त्याची टक्केवारी ८५.०९ टक्के आहे व आतापर्यंत ३ लक्ष २६ हजार ८६२ बाधित शेतकरी यांचे खात्यात ३०३ कोटी ५४.३७ लक्ष इतका निधी डीबीटी द्वारे जमा करण्यात आला.