हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वंदिले यांची निवड:कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि गतिमान नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे शहरातील अतुलभाऊ वंदिले यांची नुकतीच वर्धा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर हिंगणघाट व समुद्रपूर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि विविध मान्यवरांनी अतुलभाऊ वंदिले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.