औसा: शिंदाळा (लोहारा) येथील शेतातून देवणी गाय आणि वासराची चोरी, औसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Ausa, Latur | Mar 11, 2024 शिंदाळा लोहारा येथील शेतातून दावणीला बांधलेली देवणी जातीची गाय आणि ३ महिन्यांचे वासरू चोरीला गेल्याचे ११ मार्च रोजी सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी गोविंद दोडके यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.