बुलढाणा: बुलढाणा रेसिडेन्सी येथे नगरपरिषद निवडणूक प्रचारार्थ डॉक्टर एसोसियेशन यांची सहविचार सभा
बुलडाणा शहरातील नगर परिषद निवडणूकांच्या निमित्त्याने महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. लक्ष्मी दत्ता काकस व सर्व महाविकास आघाडीतील प्रभागातील उमेदवार यांच्या प्रचारार्थ बुलढाणा रेसिडेन्सी येथे २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाविकास आघाडीच्या वतीने बुलढाणा शहरातील डॉक्टर केमिस्ट यांची सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सहविचार सभेला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.