मलकापूर तालुक्यातील एकूण ४९ ग्रामपंचायतींच्या सरपंचाची पदे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३० (४) (५) अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनुसार सन २०२५ ते २०३० दरम्यान मलकापूर तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यासाठी सभा आयोजित केली आहे.