नांदुरा: 'कर्जापायी टाकरखेड येथील युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.'
तालुक्यातील टाकरखेड येथील शेतकरी देविदास आत्माराम खोंदले वय 38 वर्ष या युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जापायी स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे.सततची नापिकी व गेल्या एक दोन वर्षांपासून ऐन पीक घरात येण्याच्या अवस्थेत अतिवृष्टीसदृश्य पावसाचा कहर होत असल्याने उत्पन्नाच्या आशेवर वेळोवेळी पाणी फिरत असल्याने आर्थिक विवचनेतून कर्ज भरावे तरी कसे?अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते