आज दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास मिरा रोड येथील काशिमीरा परिसरात कोरे आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड सापडले आहेत. कोरे आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड सापडल्याने स्थानिक नेते आक्रमक झाले असून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकावर आरोप केले जात आहे. यावेळी स्थानिक नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना धारेवर धरलेले पहायला मिळाले.