समुद्रपूर: गिरड येथील गुरुकुल विद्या निकेतन मध्ये दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा: विद्यार्थ्यांना पटवून दिले दिवाळीचे महत्त्व
समुद्रपूर: गिरड येथील गुरुकुल विद्या निकेतन मध्ये विद्यार्थी आनंद व दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून मातीच्या दिव्यांची व शुभेच्छा कार्डची निर्मिती करून आपली कलात्मकता सादर केली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कलागुणांनी वेगवेगळ्या सुंदर आकाश दिव्यांची निर्मिती केली. रंगीबेरंगी दिव्यांनी शाळा परिसर उजळून निघाला.यावेळी सुषमाताई दुबे यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सण म्हणजे काय या सणाचे महत्त्व समजावून सांगितले.