लोहा: इंस्टाग्राम अकाउंटवर दोन समाजात तेढ निर्माण होणारा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणा-याविरूद्ध सोनखेड पोलिसात गुन्हा दाखल
Loha, Nanded | Nov 27, 2025 दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास इन्स्टाग्राम अकाउंट वरून यातील आरोपी नामे बालाजी नरवड याने आपले मोबाईल मधील instagram अकाउंट वर दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला. याप्रकरणी फिर्यादी शेख काशीम शेख आली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनखेड पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल झालेला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हंबर्डे आज करीत आहेत.