जालना: जालना तालुक्यात मुसळधार पावसाने शेतकरी आणि नागरिकांमध्ये हाहाकार; काही गावांच संपर्क तुटला तर शेतपिकाचेही मोठे नुसान
Jalna, Jalna | Sep 22, 2025 जालना तालुक्यातील विविध भागांमध्ये सोमवार दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 3 वाजेपासून झालेल्या मुसळधार ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. सावंगी तलाव, बर्डी, पाहेगाव, दहिफळ, पारेगाव, जैतापूर, बाजी उम्रद, मानेगाव शिवारामध्ये कपाशी, सोयाबीन, मुग, उडीद, मका आणि फळबागांवर पावसाने हाहाकार माजवला. शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान उखळी येथील पाझर तलाव फुटल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. शेवली परिसरातील शेतकरी हवालदिल झालेत.