काकडे प्लॉट धाराशिव हिरो होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल लंपास,आनंदनगर पोलीस ठाणेत गुन्हा नोंद
Dharashiv, Dharavshiv | Sep 7, 2024
आनंदनगर पोलीस ठाणेत फिर्यादी दत्तात्रय केरबा वनवे,रा.काकडे प्लॉट धाराशिव जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 AM 7379 ही दि.2 सप्टेंबर रोजी सायं.9.30 ते दि. 3 सप्टेंबर रोजी स.5 वा.काकडे प्लॉट धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी दत्तात्रय वनवे यांनी दि.6 सप्टेंबर रोजी दु.1 वा.दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती आज दि.7 सप्टेंबर दिली