उमरेड: पोलीस ठाणे उमरेड हद्दीतील अनमोल हॉटेल जवळ ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू, उमरेड ठाण्यात गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Nov 7, 2025 पोलीस ठाणे उमरेड हद्दीतील अनमोल हॉटेलजवळ सहा नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास पांडुरंग लुटे हा त्याच्या दुचाकीने उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून चना विकून घरी जात असताना त्याला अनमोल हॉटेल जवळ एका ट्रकने जोरदार धडक दिली. यात पांडुरंग चा जागीच मृत्यू झाला. उमरेड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रकचालक कमलेश मेश्राम याला अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.