सेलू: बोरखेडी (कला) येथे महिलेस शिवीगाळ करून एकास जीवे मारण्याची धमकी; आरोपीविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Oct 11, 2025 एकाने दारू पिऊन येत अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना तालुक्यातील बोरखेडी (कला) येथे घडली. याप्रकरणी चंदा पुरुषोत्तम चव्हाण (वय 55 रा. बोरखेडी (कला) यांच्या फिर्यादीवरून अमोल नाना चव्हाण रा. बोरखेडी (कला) याच्याविरुद्ध ता. 10 शुक्रवारला दुपारी 12.15 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती ता. 11 ला सेलू पोलिसांकडून मिळाली.