सेनगाव: कौटुंबिक वादातून वडिलांचा खून करणाऱ्या दोन मुलांना जन्मठेप,पानकनेरगाव येथील घटना
सेनगाव पानकनेरगाव या ठिकाणी कौटुंबिक वादातून वडिलांचा खून करणाऱ्या दोन मुलांना आजीवन कारावास व प्रत्येकी साडेसात हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावला आहे़. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे संजय आबाराव देशमुख यांचा त्यांचा मुलगा निखिल देशमुख व गजानन देशमुख यांच्यासोबत कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता यावेळी 4 जून 2022 रोजी संजय देशमुख यांना निखिल व गजानन यांनी मारहाण करून जीवे मारले व त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.