सुधागड: पाली सुधागड येथे गुजराती समाज हॉलमध्ये जीएसटी सुधार संमेलन संपन्न
आज सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास पाली (सुधागड), जि. रायगड येथील गुजराती समाज हॉलमध्ये जीएसटी सुधार संमेलन संपन्न झाले. व्यापारी वर्ग, उद्योजक आणि कर सल्लागार यांच्याशी सखोल चर्चा करताना अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचारमंथन झाले आणि रचनात्मक सूचना समोर आल्या. जीएसटी प्रणाली अधिक पारदर्शक, सोपी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी अशा संवादांचे योगदान अमूल्य आहे. या संमेलनातून सुधारणा आणि सशक्तीकरणाचा स्पष्ट दिशादर्शक मार्ग मिळाला.