कुरखेडा: जांभूळखेडा येथील धान पीक मूसळधार पावसाने जमीनदोस्त,मदत द्या तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन
तालूक्यात दि ५ आक्टोबंर रोजी आलेल्या मूसळधार पाऊस व वादळ वार्यामूळे जांभूळखेडा व परीसरातील गर्भात असलेला व निघालेला उभा धान पीक जमीनदोस्त होत शेतकर्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे या नैसर्गिक आपत्तीने खचलेल्या शेतकर्याना जगण्याचे बळ देण्याकरीता तातडीने नूकसानीचे पंचनामे करीत नूकसान भरपाई अदा करावी अशी मागणी दि ६ आक्टोबंर सोमवार रोजी दूपारी २ वाजता तहसीलदार कूरखेडा यांचा मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन पाठवत पिडीत शेतकर्यानी केली आहे.