चाळीसगाव: जनसेवेचा वसा कायम: माजी नगरसेवक प्रभाकर भाऊ चौधरी यांच्या पुढाकाराने उपक्रम
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक श्री. प्रभाकर भाऊ चौधरी यांच्या विशेष पुढाकाराने आज चाळीसगाव येथील चौधरी वाडा परिसरात बांधकाम कामगारांना गृहपयोगी संच (भांडी) वाटप करण्यात आले. मंडळाच्या कल्याणकारी योजनेतून गरजू कामगारांना हा लाभ मिळाला. यावेळी आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी कामगार उपस्थित होते.