तिरोडा तालुक्यातील खडकी(डोंगरगाव) परिसरात दिनांक 9 जानेवारीला सकाळी रक्ताचा थरार अनुभवायला मिळाला. आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत एका चार वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला बिबट्याने जबड्यात पकडून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण हल्ल्यात हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४ वर्ष) या बालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली असून वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.