पुसद: सरन्यायाधीश मा.भूषण गवई यांच्यावर हल्ल्या करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; भीम आर्मी व आजाद समाज पार्टी
देशाचे सर्वोच्च न्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा भीम आर्मी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव आणि आजाद समाज पार्टी युवा मोर्चा, यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत तर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रपती महोदयांना उद्देशून निवेदन मा. उपविभागीय अधिकारी, पुसद यांच्या मार्फत देण्यात आले.