भंडारा शहरात राबविल्या जाणाऱ्या धडक अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निषेधार्थ आज 20 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान स्थानिक दुकानदार आणि छोट्या व्यापाऱ्यांनी नगर परिषद प्रशासनावर आपला रोष व्यक्त करत 'घेराव घातला. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने टपऱ्या आणि दुकाने जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यात दुजा भाव करण्यात आल्याचा आरोप करीत शेकडो व्यापाऱ्यानी नगर परिषद कार्यालयाला घेराव घातला.