अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला गेल्या सात महिन्यांपासून त्रास देत जबरदस्तीने मैत्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने महिलेचा पाठलाग करत तिच्या मुलांच्या अपहरणाची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा सोनाजी गोरे (वय 25, रा. खंडेराव नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिला आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करून मैत्रीची