अंबरनाथ येथे कल्याण बदलापूर महामार्गावर एका भरधव वेगाने येणाऱ्या टॅंकरने दुचाकीला चिरडल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी वरून कल्याणच्या दिशेने जात असलेल्या आईचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर आजूबाजूचे नागरिक मदतीला धावले आणि जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तसेच याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर टँकर चालक पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.