खुलताबाद: "एकजुटीने काम करा, विजय नक्की!" — आमदार सतीश चव्हाण यांचे गल्लेबोरगावात आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ खोसरे आणि शोभाताई खोसरे यांच्या वतीने गल्ले बोरगाव (ता. खुलताबाद) येथे दिवाळी फराळ व स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर, तालुका अध्यक्ष सुरेश जाधव, तुकाराम हारदे, ज्ञानेश्वर मातकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित.