नाशिकरोड कोर्टाच्या बाहेरील पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने हिरो होंडा स्प्लेन्डर दुचाकी चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान नाशिकरोड कोर्टाच्या बाहेरील पार्किंगमध्ये उभी असलेली हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच १५ डीजी २६६७) काळ्या रंगाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी जाखोरी (ता. जि. नाशिक) येथील इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग व्यवसायिक लतिफ गुलाब शेख (वय ४८) यांनी तक्रार दाखल