परांडा: कत्तलीसाठी ३५ वासरांची निर्दयी वाहतूक परंडा पोलिसांनी रोखली; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
कत्तलीच्या उद्देशाने केली जाणारी ३५ गोवंशीय वासरांची वाहतूक रोखली आहे. अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून नेत असलेल्या या वासरांची सुटका करण्यात आली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या कारवाईत वाहन आणि वासरांसह एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अतुल किसन बागल (वय ३२, रा. साडे, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि दिनेश लक्ष्मण चव्हाण (वय १९, रा. केम, ता. करमाळा, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेतले. अशी परंडा पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी चार वाजता दिली.