मौदा: बोरगाव येथे बसस्थानक जवळ आढळला तरुणाचा मृतदेह
Mauda, Nagpur | Oct 20, 2025 नागपूर- भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव येथे बसस्थानक जवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली.प्रविणकुमार रामराम वानखेडे वय 40 वर्षें राहणार पारडसिंगा असे मृतक तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृतकाची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू करून ओळख पटविली. त्यावरून मृतकाच पंचनामा करण्यात येऊन मौदा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास मौदा पोलीस करित आहेत.