रत्नागिरी: पावस येथील कुणबी समाजनेते, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील नावले यांचे निधन
रत्नागिरीतील कुणबी समाजनेते, पंचायत समितीचे माजी उपसभापती तसा संजय गांधी निराधार योजनो रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुनील नावले यांचे सोमवारी दुःखद निधन झाले. येथील विविध सामाजिक कार्य, संघटन कार्यात सदैव अग्रणी असणारे हे व्यक्तीमत्व होते.रत्नागिरी तालुक्यातील पावस दशक्रोशीत सुनील गोपाळ नावले (वय सुमारे 50) रा. नाळ-पावस हे सर्व परिचित होते. एक सुस्वभावी, साधी राहणी असे हे व्यक्तीमत्व होते. कुणबी समाज संघटन असो किंवा येथील विविध सामाजिक कार्यात ते सदैव अग्रणी होते.