राहुरी: कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लुट थांबवा, शेतकरी नेते रवींद्र मोरे बाजार समिती सभागृहात अधिकाऱ्यांवर भडकले
राहुरी तालुक्यामध्ये खाजगी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप करत वजनमाप अधिकारी गप्प का असा सवाल उपस्थित करत शेतकरी नेते रवींद्र मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले कापूस खरेदी करताना कुठलीही घट पकडु नये, खाजगी व्यापाऱ्यांचे काटे तात्काळ तपासणी करावेत अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे. शनिवारी दुपारी बाजार समितीच्या सभागृहामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती.