तळा: तळा:मेकडे सभागृह येथे शिवसेना शिंदेगटाची मार्गदर्शन सभा संपन्न.
Tala, Raigad | Apr 8, 2024 तळा शहरातील मेकडे सभागृह येथे सोमवार दि.८एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान शिवसेना शिंदेगटाची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन सभा संपन्न झाली.या सभेला महाड,पोलादपूर, माणगाव चे आमदार भरत गोगावले यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेना शिंदेगट जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख प्रदूम ठसाळ,शहर प्रमुख राकेश वडके यांसह शिवसेना शिंदेगटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.