नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीत जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत हरविलेले मोबाइल फोनचा तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकूण १२ मोबाइल फोन हस्तगत केले असून, ते संबंधित मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत, अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली .