आज दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान नांदेड जिल्ह्यात 25 बिबटे आढळून आल्याची नोंद वनविभागाकडे झाली आहे. अर्धापुर तालुक्यातील रोडगी, पांगरी, निमगाव, चोरंबा या गावात बिबट्याने धुमाकूळ घातलाय. शेतीतील आखाड्यावरील पाळीव प्राण्यांना बिबट्याने लक्ष केले आहे. अर्धापूर तालुक्यातील या गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. काल रोडगी येथील शेतकरी शिवाजी कदम यांच्या आखाड्यावरील दावणीला बांधलेल्या वासराचा बिबट्याने बळी घेतला बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे