सुरगाणा: हरणगाव येथे गटविकास अधिकारी जगन सुर्यवंशी यांचे उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रारंभ
Surgana, Nashik | Sep 18, 2025 ग्रूप ग्रामपंचायत हरणगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उदघाट्न गटविकास अधिकारी जे.टी. सुर्यवंशी यांचे हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मनोगत नागरिकांना ऐकवण्यात आले.महाराष्ट्र गीताने सुरुवात करतांना हरणगाव येथील कलापथकाने पारंपारिक गीते सादर करून जनजागृती केली. शासन निर्णयाप्रमाणे या अभियानात हरणगाव ग्रामपंचायत सक्रीय सहभाग घेत असल्याने सरपंच पल्लवी भरसट यांनी तात्काळ 31 हजाराची मदत दिली.