मावळ: सुप्रसिद्ध कॅलिग्राफर पद्मश्री अच्युत पालव यांचेकडून 'श्री शिवशंभू तीर्थ' शिल्पाचा लोगो समितीकडे सुपूर्द....
Mawal, Pune | Oct 18, 2025 छत्रपती शिवशंभू स्मारक समितीच्या भव्य 'श्री शिवशंभू तीर्थ' या शिल्प प्रकल्पाचा लोगो सुप्रसिद्ध कॅलिग्राफर आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अच्युत पालव यांनी अत्यंत देखण्या, आकर्षक आणि भावनाप्रधान शैलीत साकारला आहे. त्यांच्या कलात्मक हस्तकौशल्यातून तयार झालेला हा लोगो शुक्रवार दि १७ऑक्टोंबर रोजी समितीच्या प्रतिनिधींना औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला.