गोरेगाव: जगत महाविद्यालय येथील सभागृहात सर्व सभासद/संचालक श्री पोवार बिगर शेती सहकारी पत संस्थेची सभा संपन्न
सर्व सभासद/संचालक श्री पोवार बिगर शेती सहकारी पतसंस्था गोरेगावची सर्वसाधारण सभा जगत महाविद्यालयात दि.21 सप्टेंबरला दु.12 ते 4 वाजेच्या दरम्यान संपन्न झाली.या सभेत मागील सर्वसाधारण आमसभेचा वृत्तांत वाचून कायम करण्यात आला.2024-25 या वर्षाचे जमाखर्च नफा तोटा ताळेबंद पत्रक वाचून मंजूर करणे,थकीत कर्जदारांच्या यादीचे वाचन करणे व त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई करण्याबाबत चर्चा करणे. नफ्याचा विनियोग पत्रावर चर्चा करून मंजुरी देणे.आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी संचालक उपस्थित होते.